Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Monday, July 23, 2018

NEWS 23/07/2018

NEWS 23/07/2018


सुकन्या समृद्धी योजना : १००० नाही केवळ २५० रुपयांत उघडा खातं


मोदी सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान जमा राशी १ हजार रुपयांपासून कमी करून २५० रुपये करण्यात आली आहे.
👍यामुळे आता अधिकाधिक जनतेला याचा फायदा होणार आहे.
▫वार्षिक १ हजार ऐवजी २५० रुपये जमा करावे लागणार आहेत.

 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीत होणार मालामाल


▫राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या दिवाळीपासून सातवा वेतन आयोग लागू होईल, अशी घोषणा नुकतीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
▫येत्या नोव्हेंबर महिन्यापासून त्या शिफारशी लागू करण्याची सरकारची तयारी असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
[09:41, 7/23/2018] +91 94223 01733: आज २३ जुलै
आज मराठी व हिंदीतील चतुरस्त्र अभिनेते मा.मिलिंद गुणाजी यांचा वाढदिवस
जन्म:- २३ जुलै १९६१
द्रो हकाल', 'फरेब', 'विरासत' गॉडमदर' यांसह इतर अनेक मराठी सिनेमांमधून मिलिंद गुणाजी आपल्याला परिचित आहे. यांसह अनेक ब्रँडसाठी ते मॉडेलिंग करतात. महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि अन्य प्रेक्षणीय स्थळे यांची दूरचित्रवाणीच्या पडद्यावर ओळख करून देणारे मिलिंद गुणाजी यांचे ते कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहेत. मिलिंद गुणाजी हे उमदे आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे यात शंकाच नाही. भटकंतीमधले विचारही सुंदर आहेत. महाराष्ट्राचे वैभव असणारे गडकिल्ले लोकांनी बघावेत त्यांच्या रक्षणासाठी प्रयत्न करावेत हे विचारही अगदी पटणारे आहेत. गडकिल्ले, थंड हवेची निर्सगरम्य ठिकाणे, दर्याखोर्यांची प्रेक्षकांना माहिती करून देण्यासाठी उन्हातान्हात रानीवनी भटकणारे ‘भटकंती’ फेम मिलिंद गुणाजी हे कवी पण आहेत. अभिनय, फोटोग्राफी आणि भटकंती या प्रवासात स्फुरलेल्या कविता कागदावर त्यांनी उतरवल्या आणि तयार झाला अल्बम 'मन पाखराचे होई'. चंदेरी, भटकंती आदीसारखे पुस्तकेही त्यांनी प्रकाशित केली आहेत.  मिलिंद गुणाजी यांच्या कविता आपल्याला http://www.milindgunaji.in/ या त्यांच्या वेब साईटवर बघता येईल. मिलिंद गुणाजी यांनी हिंदी, मराठी चित्रपटांबरोबर साऊथ इंडियन व इंग्रजी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. त्यांनी  जवळपास २०० सिनेमातून कामे केली आहेत. मॉडेलिंग मुळे एक नवा विक्रम मिलिंद गुणाजी यांनी प्रस्थापित केला आहे. तो असा, की ते ब्रँड अँम्बेसिडर असलेल्या विविध कंपन्यांचे आठ होर्डिंग 'मुंबई पुणे एक्स्प्रेस वे'वर लावण्यात आले आहेत. या रस्त्यावर इतर हिंदी कलाकारांचीही होर्डिंग आहेत; परंतु इतक्या संख्येत होर्डिंग असलेले मिलिंद गुणाजी हे एकमेव आहेत.
आपल्या समुहातर्फे मा. मिलिंद गुणाजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers