Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Thursday, July 19, 2018

पहिल्या फ्युनिक्यूलर ट्रॉलीचं लोकार्पण

सप्तश्रुंगी गडावर देशातील पहिल्या फ्युनिक्यूलर ट्रॉलीचं लोकार्पण
नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रुंगी गडावर देशातील पहिल्या फ्युनिक्यूलर ट्रॉलीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या ट्रॉलीमुळे महिला, दिव्यांग आणि वृद्ध भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुलभ होणार आहे.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसोबतच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या वेळेअभावी गेल्या सहा ते सात महिन्यापासून ट्रॉलीचं लोकार्पण रखडलं होतं. अखेर या ट्रॉलीच्या लोकार्पणाला आजचा मुहूर्त मिळाला.

कशी आहे फ्युनिक्यूलर ट्रॉली?

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ट्रॉलीचं काम हाती घेण्यात आलं होतं. भारतात पहिल्यांदाच अशा स्वरुपाचा रोप वे बनवण्यात आला असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. रशियन तंत्रज्ञानाची मदत घेऊन रोप वे बनवण्यात आला आहे.

मेक इन इंडिया अंतर्गत प्रकल्पाचं काम करण्यात आलं. मेट्रोच्या धर्तीवर डब्याची रचना करण्यात आली आहे. एका वेळी 60 भाविक या ट्रॉलीमधून प्रवास करु शकतात.



ट्रॉलीला एकूण नऊ ब्रेक्स बसवण्यात आले आहेत. एका वेळी दोन-तीन ब्रेक फेल झाले तरी देखील उर्वरित ब्रेक आपली कार्य चोख बजावतात.

एका रोपला सपोर्ट करण्यासाठी आणखी एक रोप टाकण्यात आला आहे. तांत्रिक अडचण आल्यास सिक्युरिटी अलार्म वाजतो.

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींचा प्रवास सर्वात सुखकर होणार आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आल्या असून तीन लिफ्ट जोडण्यात आल्या आहेत.

सप्तश्रुंगी गड समुद्र सपाटीपासून 12 हजार मीटर उंचीवर आहे.



40 अंशात रोप वे बांधण्यात आला आहे.

रोप वेची लांबी 167 मीटर, तर उंची 100 मीटर आहे.

सप्तश्रुंगी गडाला 550 पायऱ्या असून पायथ्यापासून देवीच्या गाभाऱ्यापर्यंत जाण्यासाठी महिला ज्येष्ठ नागरिकांना याआधी दीड ते दोन तास वेळ लागायचा. आता मात्र अवघ्या दीड मिनिटात भाविक मंदिरापर्यंत पोहोचू शकणार आहेत.

2.7 मीटर प्रती सेकंद या वेगाने ट्रॉली वरतून खाली आणि खालून वर येणार आहे.

कंट्रोल रुममधून संपूर्ण रोप वेची यंत्रणा कार्यान्वित होते.

सीसीटीव्हीमुळे संपूर्ण ट्रॉलीचं बारकाईने निरीक्षण करता येतं.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers