Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Friday, July 27, 2018

सकाळच्या बातम्या



सकाळच्या बातम्या 

दि. 28/07/2018

संकलन - लक्ष्मीकांत सोरटे (वाकी)

● नवी दिल्ली - माल वाहतूकदारांचा संप अखेर मागे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबतच्या बैठकीनंतर माल वाहतूकदारांच्या शिखर संघटनेचा निर्णय

● नवी दिल्ली - धोकेबाज एनआरआय पतींना कोर्टाचे समन्स व वॉरंट बजावण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय एक वेबसाइट तयार करतेय

● नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीत 250-275 जागा लढवण्याचे काँग्रेसचे धोरण तर 450 ते 480 जागा लढण्याचे भाजपचे लक्ष्य

● नवी दिल्ली - भारतीय पासपोर्टधारकांना फ्रान्समध्ये एअरपोर्ट ट्रान्झिट व्हिसाची आता गरज नाही

● नवी दिल्ली - 104 वर्षांनंतर दिसले सर्वात दीर्घ चंद्रग्रहण; 3 तास 45 मिनिटे चालला पृथ्वीच्या सावलीचा खेळ, खगोलप्रेमींनी लुटला आनंद

● चेन्नई - द्रमुक प्रमुख एम. करुणानिधी यांची तब्येत बिघडली, सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे

● कराची (पाकिस्तान) - महेश कुमार मलानी सिंध प्रांतातातून नॅशनल असेंब्लीत निवडून जाणारे पहिले हिंदू बनले

● न्यूयॉर्क – बजेटनुसार फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेवर वार्षिक 69 कोटी रुपये म्हणजे दिवसाला 19 लाख रुपये हा खर्च असेल

● सॅमसंगने नुकताच न तुटणारा आणि लवचीक असणारा डिस्प्ले केला तयार, याला लवकरच स्मार्टफोन्समध्ये वापरले जाणार

● मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने देखील अगदी गपचुप उरकला साखरपुडा, डेन्मार्क बॅडमिंटन खेळाडू Mathias Bao सोबत केला साखरपुडा

● अहमदनगर - महापालिकेने येत्या 1 ऑगस्टपासून बांधकाम परवाने ऑनलाईन देण्याची अंमलबजावणी करण्याची तयारी केली सुरु

● अहमदनगर - गेल्या महिनाभरापासून प्रतिक्षेत असलेला महापालिकेच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने केला जाहीर, त्यानुसार 27 ऑगस्टला प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार

● अहमदनगर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्रीगोंदा तालुक्यातील मढेगाव येथील मागासवर्गीय ग्रामपंचायत सदस्य पूजा साळवे यांचा राजीनामा

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers