Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Sunday, July 29, 2018

ABP माझा बुलेटीन २९/०७/२०१८

ABP माझा बुलेटीन  २९/०७/२०१८ 


1. रायगडमधील पोलादपूरमध्ये आंबेनळी घाटात बस दरीत कोसळली, पिकनिकला निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या 33 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू 



2. पोलादपूर बस दुर्घटनेतून एकमेव कर्मचारी वाचला, दरीतून वर येऊन अपघाताची माहिती, बसमधून उडी मारल्याने कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक प्रकाश सावंतदेसाई अपघातातून बचावले 





3. पोलादपूर बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून चार लाखांची मदत, तर मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधानांसह, राहुल गांधींकडून शोक व्यक्त






4. मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन, सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती, गंभीर नसलेले गुन्हे मागे घेणार



5. मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती आवश्यक, त्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारु, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका



6. तासाभरासाठी पंकजाताईंना सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल करा, मराठा आरक्षणावरुन शिवसेनेचा ‘सामना’तून टोला




7. सरकार खोटं बोलत नाही हे दाखवा, चंद्रकांतदादांनी साप सोडण्याच्या आरोपाचे पुरावे द्यावेत, छत्रपती संभाजीराजेंची मागणी



8. मराठा समाजाचं आंदोलन पुन्हा पेटणार, दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास 1 ऑगस्टपासून जेलभरो आंदोलन, महामुंबई मराठा मोर्चाचा इशारा




9. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मुंबईत भेट, सुमारे दीड तास चर्चा 




10. राज्यभरातील डॉक्टर आज संपावर, नॅशनल मेडिकल कमिशन बिलाविरोधात इंडियन मेडिकल असोशिएशनचा आक्रमक पवित्रा 




11. पुण्यातील रांका ज्वेलर्सचे दीड कोटींचे हिरे आणि सोन्याचे दागिने लंपास, स्टेशन परिसरात कामगारावर चाकूहल्ला करत मुद्देमाल लुटला 






12. पुण्यातील कात्रजमधील मदरशात मुलांचं लैंगिक शोषण, 21 वर्षीय मौलवीला बेड्या, 36 मुलांची सुटका 




13. यूपीएससीमध्ये मराठी टक्का वाढवण्यासाठी महाराष्ट्रीयन अधिकारी सरसावले, उत्तीर्ण विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी, 'पुढचे पाऊल' संस्थेचा खास कार्यक्रम
14. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम करुणानिधी यांच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र हॉस्पिटलमध्येच राहणार, रुग्णालयात अनेक नेत्यांची हजेरी  
15. भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघाचा श्रीलंकेला क्लीन स्वीप, चारदिवसीय कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली, मात्र अर्जुन तेंडुलकरकडून निराशा 

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers