Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Sunday, July 22, 2018

थोडक्यात २२/०७/२०१८


🏵 शंभरची नवी नोट एटीएममधून येण्यासाठी 100 कोटींचा खर्च 🏵

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गुरुवारी शंभर रुपयांच्या नव्या नोटेची घोषणा केली. ही नोट लवकरच चलनात येणार आहे. शंभर रुपयांच्य़ा नोटेचा आकार हा जुन्या नोटेपेक्षा वेगळा आहे. यासाठी एटीएम रिकॅलिब्रेट करावं लागणार आहे. एटीएम ऑपरेशन इंडस्ट्रीच्या माहितीनुसार, 2.4 लाख मशीन रिकॅलिब्रेट करण्यासाठी तब्बल शंभर कोटी रुपये खर्च होणार आहे.

शंभर रुपयांच्या नव्या नोटांसाठी एटीएम रिकॅलिब्रेट कराव्या लागणार असून यात जवळपास शंभर कोटी पर्यंत खर्च येणार असल्याचे हिताची पेमेंट सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक लोनी अॅन्टोनी यांनी सांगितले. तसेच या सर्व मशीन रिकॅलिब्रेट होण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागू शकतो असे ते म्हणाले.
 -----------------------------------------------

🏵 गणेशोत्सव-नवरात्रोत्सव परवानग्या आता ऑनलाईन! 🏵

सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सवासाठी मंडप व प्रवेशद्वार उभारणी करण्याकरिता आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेत ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पोलीस ना हरकत प्रमाणपत्रासाठी तो अर्ज परस्पर पोलीस व वाहतूक पोलिसांकडे वर्ग केला जाणार आहे. अर्जदारांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असल्याने त्यांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.
 -----------------------------------------------

🏵 सोलापूरातील मराठा समाजाच्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण, दोन एसटी गाड्यांची तोडफोड 🏵

मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा यासह आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शाखेच्यावतीने सोलापूरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन केले़ यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोन एसटी गाड्यांची तोडफोड करून हिंसक वळण लावले़  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेधही करण्यात आला़ या मोर्चानंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले़
------------------------------------------------

🏵 कॉल सेंटर घोटाळा; अमेरिकेत २१ भारतीयांना शिक्षा 🏵

कॉल सेंटर घोटाळ्याप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयाने २१ भारतीय नागरिकांना ४ ते २० वर्षापर्यंत शिक्षा सुनावली आहे. अमेरिकेतील हजारो नागरिकांची कोट्यवधी डॉलरची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पहिल्यांदा एकाचवेळी २१ लोकांना शिक्षा सुनावण्याची अमेरिकेतील ही पहिलीच घटना आहे. या प्रकरणामुळे भारतीय कॉल सेंटर उद्योगातील घोटाळा उघडकीस आला आहे, असे अमेरिकेचे ॲटर्नी जनरल जेफ सेशन यांनी म्हटले आहे.
------------------------------------------------

 देशात सोळाशे नागरिकांमागे एकच डॉक्टर!


 Special Updates

ग्रामीण भागात तसेच सरकारी इस्पितळांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी असल्याने आरोग्य सेवेवरील ताण कायम आहे. सध्या देशात १५९६ नागरिकांमागे एक डॉक्टर असे प्रमाण आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार एक हजार नागरिकांमागे एक डॉक्टर असे प्रमाण असायला हवे. म्हणजेच देशात डॉक्टरांची कमतरता असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

याबाबतची लेखी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी लोकसभेत दिली आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे आणि आसाममधील खासदार रामेश्वर तेली यांनी ग्रामीण भागात तसेच सरकारी इस्पितळे, आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांची संख्या कमी असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री चौबे यांनी लेखी उत्तर दिले आहे.

देशातील ॲलोपॅथिक डॉक्टरांची संख्या
१० लाख ४१ हजार ३९५  (डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत नोंदणीकृत)
८ लाख ३३ हजार (सध्या आरोग्य सेवेत सक्रिय असलेले डॉक्टर)
१: १५९६ (देशातील डॉक्टर- नागरिक प्रमाण)
१: १००० (जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार हे प्रमाण असायला हवे)
-----------------------------------------------

🏵 पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त, शासकीय धान्याचा काळाबाजार? 🏵

शासकीय धान्याचा काळाबाजार प्रकरणात नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली. शासकीय गोदामातून धान्य एका खाजगी कारखान्यात नेलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला असून तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
------------------------------------
राज्यात वैद्यकीय अधिका-यांची ‘मेगा’ भरती

--------------------------------
पोलिसांनी पळत ठेवून कारखाना परिसरात 10 ट्रकमध्ये भरलेला गहू आणि तांदूळ, जो शासकीय धान्य गोदामातून निघाला होता तो आढळून आला. हे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने कट रचून फसवणूक करणे आणि जीवनावश्यक वस्तू पुरवठा कायदा अन्वये गुन्हा नोंद केला.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers