Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Saturday, July 21, 2018

अॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार!

⚜अॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार!



             जर तुम्ही व्हॉट्सअॅप युझर असाल तुम्ही एकाच वेळी पाचपेक्षा जास्त जणांना मेसेज फॉरवर्ड करु शकणार नाहीत. बनावट युझरचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय युझर्ससाठी मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. युझर्स आता क्विक फॉरवर्ड बटणचाही वापर करु शकत नाहीत, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. क्विक फॉरवर्डचा ऑप्शन मीडिया मेसेजनंतर असतो. केवळ भारतात राहणाऱ्या युझर्ससाठी हे बदल असल्याचंही व्हॉट्सअॅपने सांगितलं.

व्हॉट्सअॅपच्या मते, "दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारतातील लोक मेसेज, व्हिडीओ किंवा फोटो जास्त फॉरवर्ड करतात. जगभरात व्हॉट्सअॅपचे 100 कोटी युझर्स आहेत, त्यापैकी 20 कोटी एकट्या भारतात आहेत. मागील काही दिवसात फेक न्यूजचा वेगाने प्रसार झाल्याने देशात अनेक अप्रिय घटना घडल्या. व्हॉट्सअॅपवर फेक न्यूज व्हायरल झाल्याप्रकरणी भारत सरकारनेही कंपनीला नोटीस पाठवली आहे. याबाबत व्हॉट्सअॅपनेही काही दिवसांपूर्वी नियमावली जारी केली होती.

📄सरकारची व्हॉट्सअॅपला दुसरी नोटीस

सरकारने व्हॉट्सअॅपला गुरुवारी आणखी एक नोटीस पाठवून बनावट आणि चुकीच्या मेसेजचा प्रसार रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यास सांगितलं होतं. अफवांच्या प्रसारात माध्यमही दोषी समजलं जाईल आणि यावर उपाय केला नाही तर तुम्हालाही कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल, असा इशाराही सरकारने दिला आहे. देशात बनावट आणि चुकीचे मेसेज पसरल्याने संतप्त जमावाने निरपराधींच्या हत्येसह हिंसेची अनेक प्रकरणं समोर आल्यानंतर सरकारने कडक धोरण अवलंबलं आहे.

सरकारने याआधीही व्हॉट्सअॅपला अशाप्रकारच्या बातम्या आणि मेसेजवर बंदी घालण्याचा इशारा दिला होता. बॅड एलिमेंट्सद्वारे जेव्हा अशा बातम्या पसरवल्या जातात तेव्हा माध्यमही जबाबदार असतं आणि उत्तर देण्यापासून ते वाचू शकत नाहीत, असं माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटलं होतं. मंत्रालयाने याबाबत व्हॉट्सअॅपला योग्य उपाय करण्याची सूचना केली होती.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers