Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Thursday, August 2, 2018

सकाळच्या बातम्या दि. 02/08/2018

 सकाळच्या बातम्या दि. 02/08/2018


● नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.25% ने वाढवून 6.5% केला, सर्वच कर्जे महागणार

● नवी दिल्ली - अॅट्राॅसिटी कायद्यातील मूळ तरतुदी कायम ठेवण्यासाठी संसदेत विधेयक मांडण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

● नवी दिल्ली - सरासरीच्या कमी पावसाचा स्कायमेटचा सुधारित अंदाज, सरासरीच्या 92 टक्के पाऊसमानाचा वर्तवला अंदाज

● नवी दिल्ली - देशभरातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये पाच हजारांहून अधिक पदे रिक्त, केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली माहिती

● नवी दिल्ली - केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (सीटीईटी) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू, सीबीएसईनुसार, 27 ऑगस्टपर्यंत ctet.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल

● जयपूर - सर्वात कमी वयात म्हणजेच वयाच्या पाचव्या वर्षी दिव्यांशा मीरचंदानीला तायक्वांदोत ब्लॅक बेल्ट, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव सामील

● मुंबई - मुंबईमध्ये नऊ वर्षांत तब्बल दहा हजार 657 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर

● अमेझॉन प्राईम सेवेला आव्हान देण्याचा प्रयत्न फ्लिपकार्ट प्लस या सेवेच्या माध्यमातून होणार, याची आता लवकरच अधिकृत घोषणा होणार

● पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या 9 बाद 285 धावा, रवीचंद्रन अश्विनने टिपले 4 बळी

● 'संजू' या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता संजूबाबाच्या आयुष्यावर आधारित वेब सीरिज येणार, जे पैलू चित्रपटाच्या माध्यमातून उलगडू शकले नाही, ते सर्व या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार


● अहमदनगर - शहर बस पुन्हा सुरू होण्याची चिन्हे, नुकसान भरपाईबाबत 'स्थायी' निर्णय घेणार

● अहमदनगर - मंगळवारी अतिक्रमण हटवल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्याच दिवशी पुन्हा विक्रेत्यांनी केले अतिक्रमण, अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी पुन्हा हातगाड्या केल्या जप्त

● अहमदनगर - कचरा संकलनातून जमा होणाऱ्या प्लास्टिकची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी सहा आधुनिक प्रकारची मशिनरी महापालिका घेणार

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers