Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Monday, July 30, 2018

बातम्या ३०/०७/२०१८



नवी दिल्ली - माझी सर्वांना विनंती आहे की, आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची 'वारी' करा. विठुरायांचं दर्शन घेणं हा एक वेगळा अनुभव आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

न्यूयॉर्क - सीरिया युद्धात 7,000 पेक्षा अधिक मुले मारली गेली असल्याची धक्कदायक माहिती राष्ट्रसंघाने दिली

कैरो - जिप्तमधील एका न्यायालयाने मुस्लिम ब्रदरहूडच्या 75 सदस्यांना सुनावली फाशीची शिक्षा, इजिप्त न्यायालयाचा निकाल

चेन्नई - डीएमके प्रमुख एम. करुणानिधी यांची तब्येत स्थिर आहे, करुणानिधी यांच्या कुटुंबीयांची माहिती

मुंबई - जेष्ठ मच्छिमार नेते महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे माजी अध्यक्ष राम भाऊ पाटील यांचे निधन

मुंबई - 'एअर डेक्कन' विमान कंपनीकडून महाराष्ट्रातील 6 शहरांतून विमानसेवा पुन्हा सुरू

लातूर - मराठा आरक्षणासाठी 9 ऑगस्टपासून एल्गार, राज्यस्तरीय बैठकीत मराठा समाजाच्या मागण्या होण्यासाठी पुढील काळातील आंदोलनाची दिशा स्पष्ट

पुणे - आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक, पुढील धोरण ठरवण्यासाठी 5 ऑगस्टला पुण्यात कृती समितीच्या बैठकीचं आयोजन

नॉर्थमटन - इंग्लंड येथिल स्थानिक टी-20 क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलने आक्रमक खेळी करत 35 चेंडूत शतक झळकावले

मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नूची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'मुल्क' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

अहमदनगर - 2 ऑक्टोबरपासून लोकपालसाठी पुन्हा उपोषण : अण्णा हजारे

अहमदनगर - सारसनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, तीन घरांत चोऱ्या; वाहनांचे नुकसान

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers